विस्मृती’चा रोग जडलाय भाजपला !
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रखर आंदोलनानंतर आणि आणीबाणी उठल्यानंतर १९७७ साली समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि संघटना कॉंग्रेस या चार पक्षांची जनता पार्टी स्थापन झाली. भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा ही पार्टी सत्तेवर आली आणि मग तिची स्थापना झाली. परंतु मधू लिमये, राजनारायण आदींच्या सततच्या दुहेरी निष्ठेच्या टीकेमुळे ६ एप्रिल १९८० रोजी…
