गडचिरोलीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सुरक्षा दलाला सरकारकडून ५१ लाखांचे बक्षीस
गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे. या कारवाईत पोलिसांकडून नक्षलवाद्यांकडील अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात १२ ते १५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते….
