श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेत स्वप्नाक्षय मित्र मंडळ प्रथम- पंचगंगा मंडळ द्वितीय, तर युवक उत्कर्ष मंडळ तृतीय
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२४’ या स्पर्धेत सातबंगला, अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला असून; करीरोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने द्वितीय पुरस्कार (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) आणि मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळाने तृतीय पुरस्कारावर (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) आपली मोहोर उमटवली आहे. यंदा शाडू मातीच्या…
