पालिका अधिकाऱ्याला ४ हजाराची लाच घेताना अटक
मुंबई – जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात . ते खरेच आहे. पालिका अधिकाऱ्यांना गलेलठ पगार मिळतो तरीही चिरीमिरी घेण्याचा हलकटपणा त्यांच्यातून काही जात नाही. पालिकेच्या टी विभागातील घनकचरा विभागाचे वित्तीय अधिकारी निर्वाना तेलगुटे याला एका कंत्राटदार महिलेकडून ४ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. पालिका अधिकारी कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतात…
