पुतळा दुर्घटनेतील शिल्पकार जयदीप आपटला अटक
कल्याण – मागच्या आठवड्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. या प्रकरणात जयदीप आपटे आणि चेतन पाटील दोघे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात मालवण पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद आहे. जयदीप…
