पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला अटक
चंदीगड /हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले, जिथे पोलिसांना ५ दिवसांची रिमांड मिळाली.अटक कधी झाली याची माहिती उघड केलेली नाही. हिसार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होती. ती सोशल मीडियाद्वारे भारताची गोपनीय माहिती पाठवत होती. ज्योतीने चार वेळा पाकिस्तानला भेट…
