यमुनेला आलेल्या महापुरामुळे अर्धी राजधानी दिल्ली पाण्यात
दिल्ली: यमुना नदीला महापूर आल्यामुळे राजधानी दिल्लीत अनेक भागांत पाणी शिरले असून नदीतील पाणीपातळी शुक्रवारी सकाळी धोक्याच्या पातळीच्या वर २ मीटर म्हणजे २०७.३१ मीटरवर पोहोचली. परिणामी महानगराच्या अनेक सखल भागांत पाणी शिरले असून निम्मे शहर जलमय झाले आहे. वासुदेव घाट ओलांडून पाणी वस्त्यांत व रिंगरोडवर शिरले असून हे पाणी उपसण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. यमुनेच्या…
