विजय वैद्य गेले ; समाजसेवेचे एक पर्व संपले! -योगेश वसंत त्रिवेदी
ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासू राजकीय विश्लेषक, समाजसेवेचा मानबिंदू, अनेक संस्था संघटनांच्या प्रसववेदनांच्या कळा सहन करुन त्या तब्बल बेचाळीस वर्षे अहोरात्र चालविणारे विजय दत्तात्रय वैद्य यांनी ऐन गणेशोत्सवात आपली इहलोकीची यात्रा संपवून परलोकी प्रस्थान ठेवले. बरोबर पंचवीस दिवसांपूर्वी विजय शंकर केळुसकर यांनी इहलोकीची यात्रा संपविली. तो धक्का सहन होत नाही तोपर्यंत दुसरा जबरदस्त धक्का देणारे समाजसेवेचे एक…
