शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर या भेटीचे अनेक अर्थ काढून तर्कवितर्कांना उधाण आले. आता स्वत: शरद पवारांनीच या भेटीची माहिती देत कारण स्पष्ट केलं. पवारांनी भेटीचा फोटो ट्वीट करत वर्षावरील भेटीची सविस्तर माहिती दिली.शरद पवार म्हणाले, “मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन…
