मुंबई श्री चे पीळदार युद्ध ७ मार्चला -मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील २५० पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग
मुंबई, (क्री.प्र.)- मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका येत्या ७ मार्चला अंधेरी पश्चिमेला सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे होणार आहे. या स्पर्धेला जे राय फिटनेसचे पाठबळ लाभले आहे. या पीळदार थराराला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मान-सन्मान दिला जाणार असल्याचे बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव…
