पुणे अपघात प्रकरणी २ डॉक्टर व सफाई कर्मचारी निलंबित ! ससूनचे डीन सक्तीच्या रजेवर
पुणे – पुणे अपघात प्रकरणातील ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरणात अखेर राज्य सरकारकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने निलंबन करण्यात आले आहे. शिवाय महत्वाचे म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात…
