रिंगण अंकासाठी तुमची मदत हवीय
आम्ही नियमितपणे पाळला तो अनियमितपणाच, हे पुलंचं वाक्य कॉलेजात असताना वाचलं, तेव्हा वाटलं हे आपल्यासाठीच. आयुष्यात त्याला अपवाद ठरलं ते फक्त रिंगण. यंदा संत चांगदेव विशेषांक हा रिंगणचा बारावा अंक. २०१२च्या आषाढीला पहिला अंक आला. पैसे नव्हते म्हणून २०१३ला अंक आला नाही. नंतर मात्र दर आषाढी एकादशीला सलग अंक येतो आहे. रिंगणची सुरवात केली, तेव्हा…
