‘हे पवारांचं जंतरमंतर’; संसदीय विधेयकाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
मुंबई: केंद्र सरकारच्या प्रस्तावित विधेयकावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. शरद पवार गटाकडून भाजपला किंवा केंद्रातील विधेयकाला सहकार्य करण्याचे संकेत मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या जुन्या विधानाची आठवण करून देत टोला लगावला आहे. संसदेच्या विशेष…
