ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

भायखळ्या्त लाकडाच्या गोदामांना भीषण आग-लाकडी गोदामेनी जमिनीवर कब्जा केल्याचा- शाळा व्यवस्थापकाचा आरोप


मुंबई/ भायखळा पू. परिसरातील ग्लोरिया कॉन्व्हेंट हायस्कूल जवळील असलेल्या एका लाकडाच्या वखरीला  भीषण आग लागली या आगीत मोठे नुकसान झाले आहे या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या शर्थीने आगीवर नियंत्रण मिळवले आता ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे हा सर्व मुस्तफा बाजारचा परिसर असून येथे काही लाकडाच्या वखारी आहेत आणि या वाखरित राहणारे काही कामगार तिथेच जेवण बनवतात कदाचित त्यातून आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे ,२०१९ मध्ये सुधा या भागातील वखरिला आग लागून मोठे नुकसान झाले होते.
        शाळेच्या  परिसरात लाकडी गोदामांनी जमिनीवर कब्जा केल्याचा शाळा व्यवस्थापकाचा आरोप आहे तब्बल 75 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या शाळेत कार्यरत असतात तब्बल दीडशे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहे. या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की शाळेच्या तीन मजल्याच्या भाग भक्षस्थानी पडला. शाळेत विद्यार्थिनी आल्यावर आग लागली असती तर प्रचंड हानी झाली असती.
     आगीच्या ऑडिट आधीच बांधकामाला सुरुवात
पहाटे पाचच्या सुमारास लागलेली आग विझविण्याचा अग्निशामक दलाला दुपारचे तीन वाजले होते या दुर्घटनेचे फायर ऑडिट होण्याअगोदरच दुकानदाराने पुन्हा बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

error: Content is protected !!