यूपीतील धर्मांतर मास्टरमाइंड छागुर बाबाला अटक
लखनौ/उत्तर प्रदेशातील धर्मांतराचा सूत्रधार जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याला एटीएसने बलरामपुर येथून अटक केली त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन हीलाही अटक करण्यात आली आहे सांगूर बाबा वर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस होते
तपास यंत्रणांनुसार, जमालुद्दीन स्वतःला हाजी पीर जलालुद्दीन म्हणवून घेत असे. तो मुलींना आमिष दाखवून धर्मांतर करण्यान भाग पाडत असे. त्याचे लक्ष्य हिंदू मुली होत्या. प्रत्येक जातीच्या मुलींसाठी त्याचे दर निश्चित होते.
छांगुर बाबाने बनावट संस्थांच्या नावाने ४० हून अधिक बँक खाती उघडली होती. त्यामध्ये सुमारे १०० कोटी रुपयांचा निदि असल्याचेही उघड झाले आहे. त्याने पाकिस्तानसह अनेक इस्लामिक देशांमध्ये ४० वेळा प्रवास केला आहे. एटीएसने दोघांनाही न्यायालयात हजर केले, त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.
एडीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) आणि यूपी एटीएस प्रमुख अमिताभ यश म्हणाले की, बलरामपूरच्या माधपूर गावात पीर साहब, नसरीन, जमालुद्दीन, मेहबूब इत्यादी नावांच्या अनेक संशयास्पद व्यक्ती राहत असल्याची माहिती मिळाली होती. तपासात असे दिसून आले की एका वर्षात परदेशी निधीतून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी करण्यात आल्या.
या टोळीतील सदस्यांनी ४० वेळा इस्लामिक देशांमध्ये प्रवास केला होता. त्यांनी स्वतःच्या नावाने आणि बनावट संस्थांच्या नावाने ४० हून अधिक बँक खाती उघडली. या खात्यांमध्ये सुमारे १०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले. हे पैसे परदेशातून पाठवले जात होते.
ज्यातून शोरूम, बंगले आणि आलिशान कार अशा मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. यानंतर एटीएसने जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा आणि त्याची साथीदार नीतू उर्फ नसरीन यांना बलरामपूरमधील माधपूर गावातून अटक केली.
एटीएसने केलेल्या चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की, जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबा पीर बाबा आणि हजरत बाबा जुलालुद्दीन या नावाने स्वतःची जाहिरात करायचा. त्याने ‘शिजर-ए-तैयबा’ नावाचे एक पुस्तक देखील प्रकाशित केले होते, ज्याचा वापर तो आणि त्याचे सदस्य इस्लामचा प्रचार करण्यासाठी आणि लोकांचे ब्रेनवॉश करण्य काळ शोध सुरू होता. तमालुद्दीनचा बराचएटीएसला माहिती मिळाली होती की आरोपींनी एक संघटित टोळी तयार केली आहे. ते हिंदू आणि बिगर मुस्लिम समुदायातील गरीब लोकांना लक्ष्य करतात. ते विधवा महिला आणि असहाय्य मजुरांना लग्नाचे आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतर करायचे. काही प्रकरणांमध्ये, धमकी देऊन धर्मांतराचे आरोप आहेत.
लखनौच्या रहिवासी गुंजा गुप्ता हिला अमितचे वेश असलेल्या अबू अन्सारी नावाच्या तरुणाने जाळ्यात अडकवले. तो तिला छांगूर बाबांच्या दर्यात घेऊन गेला, जिथे तिचे नाव बदलून अलिना अन्सारी असे ठेवण्यात आले. त्या बदल्यात तिला चांगले जीवन, पैसे आणि सुरक्षिततेचे आमिष दाखवण्यात आले. एटीएसच्या तपासात असेही उघड झाले आहे की धर्मांतरासाठी वेगवेगळ्या जातींच्या मुली आणण्यासाठी वेगवेगळे दर निश्चित केले जात होते.
ब्राह्मण सरदार आणि क्षत्रिय मुलींना १५ ते १६ लाख रुपये देण्यात आले.मागास जातीतील मुलींना १० ते १२ लाख रुपये दिले जात होते.इतर जातीतील मुलींना ८ ते १० लाख रुपये देण्यात काळ शोध सुरू होता
नोव्हेंबर २०२४ मध्ये यूपी एटीएसने छांगूर बाबा आणि त्याचा मुलगा मेहबूबसह १० जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरमध्ये नवीन रोहरा उर्फ जमालुद्दीनचेही नाव आहे. ज्याने छांगूर बाबासोबत इस्लाम धर्म स्वीकारला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर एटीएसने ८ एप्रिल रोजी दोन आरोपींना अटक केली. यामध्ये नवीन उर्फ जमालुद्दीन आणि छांगूर बाबाचा मुलगा मेहबूब याचा समावेश आहे.
या अटकेनंतर, छांगूर बाबा भूमिगत झाला. यूपी एटीएस त्याच्या शोधात छापे टाकत होते. न्यायालयाने छांगूर बाबाच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याच्यावर ५०,००० रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.
आरोपी बलरामपूरचा रहिवासी आहे.
एडीजी एलओ अमिताभ यश म्हणाले- छांगूर बाबा हा बलरामपूर येथील ठाणे गायदास येथील रेहरा माफी गावचा रहिवासी आहे. एटीएसने छांगूर बाबा आणि त्याच्या साथीदाराला आज न्यायालयात हजर केले. तेथून त्यांना न्यायालयीन रिमांडवर लखनी तुरुंगात पाठवण्यात आले. पुढील तपासात एटीएस इतर साथीदार आणि परदेशी संबंधांची चौकशी करत आहे.
आरोपी हा आंतरराष्ट्रीय मॉड्यूलचा भाग असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की, हे नेटवर्क आंतरराष्ट्रीय कट्टरपंथी संघटनांशी जोडलेले असू शकते. एटीएस आता ईडी, आयबी आणि एनआयएशी देखील समन्वय साधू शकते.