ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

भाजपचा रस्ता साफ

उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी महाराज यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रगती पुस्तकावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.मात्र आता पर्यंतची तिथली परिस्थिती पाहता योगींच्या भगव्या चोल्यात पुन्हा युपीची सत्ता पडणार असेच चित्र आहे कारण युपी मध्ये विरोधकांची अवस्था महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षा पेक्षाही वाईट आहे.विरोधकांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास एक ना धड भाराभर चिध्या अशी विरोधकांची स्थिती आहे आणि हीच गोष्ट योगी महाराज आणि साताधरी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे २०१७ क्या निवडणुकीत विरोधकांचे जे हाल झाले त्यापेक्षाही वाईट हाल यावेळी होणार आहेत.मायावतींचा एकाच जागी सुस्तवून पडलेला हत्ती आणि युपितल्या यादवा नी पंक्चर केलेली अखिलेश भय्याची सायकल यामुळे समाजवादी पार्टी आणि मायावतींची बहुजन समाजवादी पार्टी या दोघांनीही जनाधार हरवलेला आहे तर युपी मध्ये काँग्रेस असून नसल्यासारखी आहे प्रियांका गांधींनी किती जारी प्रयत्न केले तरी युपी मध्ये काँग्रेस पुन्हा जिवंत होऊ शकत नाही.आणि या निवडणुकीत काँग्रेस,समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी तिघेही स्वबळावर लढत असल्याने भाजप चां मार्ग मोकळा आहे म्हणून तर मुंबईतले रिक्षावाले,टॅक्सी वाले,पानपट्टी वाले सगळे भय्या लोक एका सुरात मोदी आणि योगिंचे गुणगान गात अबकी बार युपीमा दुबारा कमलवा खिली असे छाती ठोक पने सांगत आहेत.युपी मधील ३० ते ४० टक्के भय्या लोक मुंबईत काम करतात आणि या सगळ्यांना युपी मधील निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने मुंबईतले सगळे भय्या लोक गावी जायचा तयारीत आहेत. भाजपने अगोदरच त्यांच्या तिकीटाची व्यवस्था करून ठेवली आहे.त्यामुळे ही निवडणूक योगी महाराज एकहाती जिंकणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही या देशातील कर्मदरिद्री विरोधी पक्ष हेच बलस्थान आहेे. नाहीतर योगी आणि मोदी यांनी युपी मध्ये असे काय दिवे लावलेत की त्यांच्या पक्षाला लोकांनी पुन्हा निवडून द्यावे? वास्तविक वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा जर विरोधी पक्षाने एकजुटीने फायदा घेतला असता तर योगी महाराजांना पुन्हा कायमचे गोरखपुरचा मठाची वाट धरावी लागली असती कारण शेतकरी आंदोलन हा निवडणुकीतल्या फार मोठा मुद्दा बनला असता.पण विरोधक नालायक निघाले आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आत्मघातकी निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची फाटाफूट होणार आहे तर दुसरीकडे युपितले काही देवभोले मतदार भाजपच्या बाजूने उभे राहणार आहेत. युपीतील आजवरचा निवडणुकांचा इतिहास पाहता तिथे सर्व निवडणुका जाती धर्माच्या आधारावर लढवल्या जातात.आणि तिथे दलीत मुस्लिम आणि यादवांची मते निर्णायक ठरत असतात त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येवून निवडणूक लढवली असती आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपला घेरले असते तर युपी मध्ये नक्कीच सत्तांतर झाले असतेे. पण प्रत्येकाला स्वबळाची खमखुमी आहे त्यामुळे विरोधक यंदा अनामत रक्कम सुधा वाचवू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहेे.

error: Content is protected !!