ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

तर भोंग्यांवरून लफडी झालीच नसती

योगी महाराजांना कुणी काही म्हणो पण नमाज पण रस्त्यावरच्या नमाजाचा मुद्दा रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी यशस्वीपणे सोडवला याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे .त्याच बरोबर भोग्यांच्या बाबतीत त्यांनी घेतलेला निर्णय स्तुत्य आहे आणि त्याही पेक्षा मुस्लिम समाजाने याबाबत समंज्यायची भूमिका घेऊन त्यांना केलेले सहकार्य सुधा अभिनंदनीय आहे.योगिनी कायद्याचा वर करून सर्वोच्च न्यायालयाने भोंग्य बाबत जे आदेश दिले होते त्याची चोख अमलबजावणी करीत परवानगी न घेता मशिदीवर लावलेले भोंगे उतरवले . मात्र हा निर्णय एकतर्फी होऊ नये म्हणून मंदिरावरील भोंगे सुधा उतरवले त्यामुळे उत्तर परदेशात भोंग्यांच्यां मुद्द्यावरून आंदोलन करावे लागले नाही किंवा एकमेकांची डोकी फोडण्याची पाळी आली नाही . उलट महाराष्ट्रात सुधा काल अनेक मशिदिंमध्ये भोग्या शिवाय अजाण पार पडली त्यामुळे स्वतः राज ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले आहेत जे सरकारने करायला पाहिजे होते .ते राज ठाकरे आणि समजूतदार मुस्लिम बांधवांनी करून दाखवले . आता त्यात राजकीय पक्षांनी आग घालून पुन्हा धार्मिक तणाव निर्माण करू नये हीच महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे.त्याच बरोबर सरकारने सुधा असे वाद निर्माणच होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे तरच या महाराष्ट्रातील या देशातील बंधुभाव आणि एकात्मता टिकून राहील .

समजूतदारपणा असेल तर पर्याय सहज सापडतो
सध्या महाराष्ट्रात नमाज,भोंगे आणि हनुमान चालीसा पठाण यावरून जो वाद सुरू आहे . तो महाराष्ट्राच्या हितासाठी आणि सामाजिक स्थैर्यासाठी हानिकारक आहे पण असे वाद निर्माण व्हायलाच द्यायचे नसतात जर सरकारच्या माध्यमातून दोन्ही समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले . तर असे वाद कधीच निर्माण होणार नाहीत फक्त त्यासाठी व्होट बँकेचे शूद्र राजकरण बाजूला ठेवायला हवे आणि जेंव्हा सरकार किंवा अन्य कुणी राजकीय पक्ष एखाद्या गोष्टीवर बंदी घालण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा त्या समुदायाची गैरसोय होऊन त्यांच्यात रोष निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यायची असते . त्यासाठी पर्याय निर्माण करायचे असतात पण पर्याय निर्माण केल्याशिवाय एखाद्या गोष्टीला मज्जाव करणे चुकीचे आहे.उत्तर प्रदेशात मुस्लिमांची संख्या मोठी आहे.आणि आजवरचा जातीय दंगलीची इतिहास पाहता त्याची पहिली ठिणगी उत्तर प्रदेशात पडते.पण यावेळी मशिदींवरील भोंगे,हनुमान चालीसा या मुद्द्यांवरून देशात मोठा वाद निर्माण झालेला असताना उत्तर प्रदेशात मात्र रमजान ईद शांततेत पार पडली.याचे कारण सरकारचा धाक आणि नमाज किंवा भोंग्यंच्या बाबतीत सरकारच्या पुढाकाराने केले गेलेले प्रयत्न.यामुळेच कुठेही तणाव निर्माण झाला नाही.अक्षय तृतीया अशी की ईद दोन्ही शांततेत पार पडले.

error: Content is protected !!