ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

कर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासह बब्बर खालसाच्या चार अतिरेक्यांना अटक-महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट फसलाकर्नाल/ महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोग्याचा वाद सुरू आहे . त्यामुळे परिस्थिती काहीशी संवेदनशील बनलेली असतानाच महाराष्ट्रात मोठा घातपात घडवण्याचा कट फसल्याचे उघडकीस आले असून कर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासाह बब्बर खालसा चे चार दहशतवादी पोलिसांच्या हाती लागलेत .
फीरोजपुर येथून एक इनोव्हा कार दिल्लीच्या दिशेने निघाली आहे आणि त्यात काही संशयास्पद लोक आहेत अशी माहिती हरयाणा पोलिसांना मिळताच त्यांनी कर्नाल मध्ये सापळा लावला आणि 4 दहशत वाद्यांना ताब्यात घेतले तसेच त्या कार मधील स्फोटकांचा साठा जप्त केला त्यांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की आम्ही ही स्फोटके घेऊन महाराष्ट्रातील नांदेड कडे निघालो होतो याचाच अर्थ त्यांना महाराष्ट्रात मोठा घातपात घडवयाचा होता ? स्फोटकांचा जो साठा जप्त केलाय त्यात मोठ्या प्रमाणावर आर डी एक्स आहे.शिवाय काही शस्त्रे आहेत यातील दोघे पाकिस्तान मधील आहेत त्यामुळे या कटात पाकिस्तानचा हात आहे हे उघड झाले आहे .कारण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जे भोंगा विरोधी राजकारण सुरू आहे आणि अल्पसंख्यांक समाजाला त्रास दिला जातोय त्याचा बदला घेण्यासाठी महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट असावा अशीही शक्यता वर्तवली जात आहे . सध्या पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करीत आहेत

error: Content is protected !!