बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुतण्याची काकाला धोबीपछाड
पुणे/राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. कारखान्यावर अजित पवारांनी वर्चस्व मिळवलं असून त्यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला 21 पैकी 20 जागा मिळवल्या. तर सहकार बचाव पॅनेलला एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅ
नेलचा मात्र सुपडा साफ झाला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी जवळपास 35 तास चालली. त्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वर्चस्व कायम राहिलं आहे. तर विरोधी गटाकडून सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत.माळेगावची निवडणूक ही चुरशीने झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला चंद्रराव आणि रंजन तावरेंच्या सहकार बचाव पॅनेलने चांगलीच झुंज दिली. सांगवी गटातून चंद्रराव तावरे विजयी झाले. विरोधी गटाचे विजयी झालेले ते एकमेव उमेदवार ठरले. त्यांनी अजितदादांच्या विरेंद्र तावरे यांचा पराभव केला.
सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी हा पराभव मान्य असल्याचं सांगत अजित पवारांवर टीका केली. हा जनशक्तीविरोधात धनशक्तीचा विजय असल्याचा आरोप केला. अजित पवारांचे स्वप्न पूर्ण झालं नसल्याचंही रंजन तावरे म्हणाले. रंजन तावरे यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.
दुसरीकडे शरद पवार-युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलचा सुपडा साफ झाला. त्यांच्या पॅनेलचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
निळकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार
ब वर्ग
1) अजित पवार
भटक्या विमुक्त राखीव
2) श्री विलास देवकाते
अनुसूचित जाती राखीव
3) रतन कुमार भोसले
इतर मागासवर्ग राखीव
४) नितीन कुमार शेंडे
महिला राखीव
५) सौ संगीता कोक
६) सौ ज्योती मुलमुले
माळेगाव गट : 01
शिवराज जाधवराव
८) राजेंद्र बुरुंगले
९) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : 2
10) योगेश जगताप
11) तानाजी कोकरे
12) स्वप्नील जगताप
सांगवी गट : 01
13) चंद्रराव तावरे
१४) गणपत खलाटे) १५विजय तावरे
शिरवली गट
१६) प्रताप आटोळे
१७) सतिश फाळके
बारामती गट
१८) नितीन सातव
१९) देविदास गावडे
नीरावागज गट
२०) जयपाल देवकाते
२१) अविनाश देवकाते
