कॉंग्रेसच्या राज्यात केंद्राकडून येणार्या १ रुपयातील फक्त १५ पैसे लोकांपर्यंत पोहचायचे – पंतप्रधान
यवतमाळ-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी ते आज यवतमाळला आले. यावेळी हजारो कोटींच्या विकासकामाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “तुम्ही आठवा, इंडिया आघाडीचं जेव्हा…
