ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जरांगेंचे आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित – जरांगेना यापुढे माफी नाही – मंत्री गिरीश महाजन


जालना -अध्या सुरु असलेल्या मुलांच्या परीक्षा व सणासुदीचे जत्रांचे दिवस यामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून जरांगे पाटील यानि आपले आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित केले आहे
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, ही मागणी घेऊन उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर टीका केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळल्याने उपचार घेण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. परंतु, तब्येत बरी झाल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलन करेन असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावर आता ग्रामविकास आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीष महाजन म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना आम्ही खूप सहकार्य केलं, त्यांची मदत केली, त्यांचा मान सन्मान केला, मी स्वतः सहा वेळा त्यांच्याकडे गेलो होतो, माझे सहकारी मंत्रीदेखील माझ्याबरोबर होते. मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्तींना त्यांच्याकडे पाठवलं होतं, मुख्यमंत्री स्वतः दोन वेळा त्यांना भेटायला गेले. परंतु, मनोज जरांगे ऐकायला तयार नाहीत. आम्ही जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वकाही केलं. तरीदेखील मी म्हणेन तेच करा, नसेल करायचं तर तुमचा सत्यानाश करून टाकेन, तुमचा पक्ष संपवून टाकेन, तुम्हाला पदावरून खाली उतरवेन अशी वक्तव्ये त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी चुकीचं भाष्य केलं. छगन भुजबळांबाबतही तेच केलं. परवा तर त्यांनी कळसच केला. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र यांना जातीवाचक शिविगाळ केली. त्यांचं नाव घेऊन आई-बहिणीचा उल्लेख केला. त्यामुळे त्यांना आता माफी नाही.

error: Content is protected !!