ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या राज्यात केंद्राकडून येणार्या १ रुपयातील फक्त १५ पैसे लोकांपर्यंत पोहचायचे – पंतप्रधान

यवतमाळ-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी ते आज यवतमाळला आले. यावेळी हजारो कोटींच्या विकासकामाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “तुम्ही आठवा, इंडिया आघाडीचं जेव्हा केंद्रात सत्ता होती तेव्हा काय स्थिती होती? तेव्हा तर कृषीमंत्री सुद्धा याच महाराष्ट्राचे होते. त्यावेळी दिल्लीहून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज घोषित व्हायचे. पण ते पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधी मध्ये लुटलं जात होतं. गाव, गरीब शेतकरी, आदिवासींना काहीच मिळायचं नाही”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
“आज बघा, मी एक बटन दाबलं आणि पाहतापाहता पीएम किसान सन्मान योजनेचे २१ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्य बँक खात्यात गेले. आकडा लहान नाही. हीच तर मोदीची गॅरंटी आहे. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि सर्वसामान्यांपर्यंत १५ पैसे पोहोचायचे. काँग्रेसचं सरकार असतं तर आपल्याला जे आज 21 हजार कोटी रुपये मिळाले आहेत त्यापैकी 18 हजार कोटी रुपये मधेच लुटले जाते. पण आता भाजप सरकारमध्ये गरिबांचा पूर्ण पैसे गरिबांना मिळत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“मोदीची गॅरंटी आहे, प्रत्येक लाभार्थीला त्याचा अधिकार मिळाला आहे. त्यांच्या बँक खात्यात पैसा जमा व्हायला आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना डबल इंजिन सरकारची डबल गॅरंटी आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३८०० कोटी रुपये वेगळे ट्रान्सफर झाले आहेत. पीएम किसान सन्मान निधीचे १२ हजार शेतकऱ्यांना दरवर्षी मिळत आहे. देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे जमा झाले आहेत. यातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना 30 हजार कोटी आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांना ९०० कोटी रुपये मिळाले आहेत. तुम्ही कल्पना करा की, हे पैसे छोट्या शेतकऱ्यांना किती फायदा होत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

error: Content is protected !!