ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
राजकीय

बाबुभाई भवाणजी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र लॉक डाऊन मुळे व्यापार्‍यांचे हाल ;

मान्सून पूर्व तयारीसाठी तरी लॉक डाऊन उठवा

मुंबई (किसन जाधव) लॉक डाऊन मध्ये दुकाने बंद राहिल्यामुळे व्यापार्‍यांचे प्रंचड नुकसान होत आहे शिवाय पावसाळा तोंडावर असल्याने मोठ्या पावसात काही सखल भागात पावसाचे पाणी साचते त्यातच काही दिवसांपूर्वी तौक्दा चक्रीवादळाचा तडामुख्यामुळे अनेक दुकानांचे सुधा नुकसान झाले आहे शिवाय ज्या ठिकाणी अन्नधान्य आणि इतर माळे सुरक्षीत ठेवला जातो त्याचे सुधा नुकसान झालेय बरीचशी दुकाने आणि गोदाम झोपडपट्टी भागात असल्याने पावसाचे पाणी गोदामात शिरून त्यातले अन्नधान्य साधण्याची शक्यता आहे अगोदरच लॉक डाऊन मध्ये धंदा बसला आणि मोठा आर्थिक फटका बसलाय त्यात आता चक्रीवादळ झालेल्या दुकानांच्या नुकसानीमुळे त्यांची रीपेरींग करण्याचा यक्ष प्रश्‍न व्यापर्यांसमोर आहे त्यामुळे सरकारने 1जूनपासून लॉक डाऊन हटवून व्यापार्‍यांना कायमचे बरबाद होण्यापासून वाचवावे जी परिस्थिती व्यापार्‍यांची आहे तीच कारखान्यांची आहे लॉक डाऊन मध्ये मशनारी बंद असल्याने त्या खराब होण्याची तसेच उत्पादित माल आणि ईतर साहीत्य खराब झाल्यास कारखाने पुन्हा सुरू करणे अवघड जाईल म्हणूनच लॉक डाऊन हेटवणे गरजेचे आहे सरकारला जर वाटले की 15जून नंतर लॉक डाऊन करणे आवश्यक आहे तर ते पुन्हा तसा निर्णय घेऊ शकतात पण तूर्तास तरी लॉक डाऊन हटवावा अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली आहे

error: Content is protected !!