ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

राणा दांपत्याच्या बाल हट्टाला फडणवीसांचा पाठिंबा भाजप संघर्षाच्या तयारीत

मुंबई/ अमरावती मध्ये हनुमंताची अनेक मंदिरे असताना मुख्यमंत्र्यांच्या बंनगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट धरणे म्हणजेच एखाद्या शहरातील वातावरण बिघडवण्यासारखे आहे. त्यामुळे राणा दांपत्याची संपूर्ण महाराष्ट्रात छी थू होत असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईचे संपूर्ण महाराष्ट्र समर्थन करीत असताना या राज्याचे विरुद्ध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सरकार राणा दांपात्या बरोबर चांगले वागले नाहीत असे म्हणत त्यांचे समर्थन करीत आहेत तसेच सरकार बरोबर आता संवाद नाही तर संघर्ष करणार असे सांगत आहेत.
काल फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात सुरू असलेली कारवाई सरकारच्या इशाऱ्यावर तर मुंबईतील घटना मुख्यमंत्री कार्यालयाच्या इशाऱ्यावर सुरू आहेत असा आरोप केला आहे.तसेच उर्वरित घटना गृहमंत्र्यांच्या इशर्यावरून सुरू आहेत असाही आरोप केलाय तसेच पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षांवर हल्ले केले जात आहेत .त्यामुळे आता सरकार बरोबर संवाद नाही तर संघर्ष करणार आहोत असे सांगून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला आहे .

error: Content is protected !!