ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

बालिशपणा

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते ते आज हनुमान चालीसा पठाण करायला निघालेत. रवी राणा सांगतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत म्हणून त्याला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायचं आहे . पण महाराष्ट्रातल्या शेतकरी इथला कष्टकरी यांच्याबद्दल या पूर्वी रवी राणा इतका कधी भाविक झाला नव्हता .महाराष्ट्रात 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील 70 टक्के आत्महत्या रवी रणाच्या विदर्भात झाल्या आहेत.त्यात त्याच्या बायकोच्या अमरावती लोकसभा मतदार संघातील तसेच रवी रानाच्या बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांचा सुधा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे . त्यांच्यासाठी यापूर्वी कधी राणा दांपत्याने हनुमान चालीसा पठण केले नाही किंवा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना कधी चार पैशाची मदत केली नाही .पण भाजपचा त्यांना टेकू मिळताच त्यांनी शिवसेनेशी पगा घ्यायला सुरुवात केली .पण शिवसेना भाजपच्या संघर्षात यांची अवस्था किड्या मुंग्यांसारखी होणार आहे.कधी कुठे आणि कसे चिरडले जातील याचा त्यांना पत्ताही लागणार नाही. एस टी कामगारांनी असाच अतिरेक करून पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता . आज काय त्यांची अवस्था झालीय ते तरी बघा! त्यामुळे कोणाच्या तरी चिथावणी वरून मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरायचा आणि शिवसेनेच्या रोषाला कारणीभुत व्हायचे हे बरोबर नाही . कारण उद्या जर शिवसैनिकांनी याना फटकावले तर भाजपवाले सोडवायला येणार नाहीत.याची तरी त्यांना अक्कल असायला हवी होती.त्यांच्या मतदार संघात येवढे प्रश्न असताना नको तो विषय घेऊन काहीतरी बालिशपणा करायचा हे आता पुरे झाले . कारण संपूर्ण महाराष्ट्र बघतोय या लोकांचे नाटक! आणि महाराष्ट्राला ही अशी नाटके नवी नाहीत .मोठ्या मुश्किलीने मिळालेली आमदारकी आणि खासदारकी टिकवून लोकांचे प्रश्न सोडवायचे सोडून कोणाच्या तरी सांगण्यावरून नको ते धाडस करायचे आणि नंतर पश्चात्ताप करायचा हे काही बरोबर नाही.

error: Content is protected !!