ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पंतप्रधान मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार


मुंबई/ गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला . यावेळी संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते हृदयनाथ प्रकृती अस्वस्थ असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत .
माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सोहळ्याला राज्यपाल कोषारी आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस हे सुधा हजर होते यावेळी बोलताना मोदींनी सांगितले की लतादीदी याझ्या मोठ्या भगिनी होत्या त्यांना पाहण्याचे त्यांच्याशी बोलण्याचे भाग्य मला लाभले.त्यांची माझी ओळख सुधीर फडके यांनी करून दिली होती .त्यानंतर आमच्यात बहिनभावाचे जे नाते निर्माण झाले ते कायम टिकून राहिले मी खरे तर पुरस्कार स्वीकारत नाही पण लतादीदींच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार मी नाकारू शकलो नाही असेही त्यांनी सांगितले .यावेळी लतादीदींच्या भगिनी आशा भोसले यांनी दीदी बरोबरच्या अनेक आठवणी सांगितल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नव्हते पण सरकारच्या वतीने सुभाष देसाई हजर होते

error: Content is protected !!