ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

भाजप आमदाराची शेतकऱ्यांच्या सोबत पिठल भाताची पंगत – दिवाळी काळी


मुंबई/अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कंगाल झालाय अशा स्थितीत सरकार कडूनही पुरेशी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे .म्हणूनच शेतकऱ्यांच्या या वेदना सरकार समोर मांडण्यासाठी राज्यभर काळी दिवाळी केली .
आज भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले तसेच रस्त्यात चुली पेटवून पीठल भात चटणी भाकर असा स्वयंपाक करून हे जेवण शेतकऱ्यांच्या पंगतीला बसून खाल्ले .यावेळी राज्यातील महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिकलि च्या आमदार श्वेता महाले यांनी महिला शेतकऱ्यांच्या पंगतीला बसून पिठळ भाताच जेवण केलं तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या सोबत चटणी भाकर खाऊन दिवाळी केली.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही काळी दिवाळी ठरतेय .
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने अवघी १० हजार कोटींची मदत जाहीर केली मात्र तीही अजून कित्येक शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यामुळे या वर्षी दिवाळीला गोड धोड सोडाच चटणी भाकर सुधा काही शेतकऱ्यांच्या नशिबी नाही म्हणूनच भाजपने शेतकऱ्यांच्या सोबत काळी दिवाळी करून निषेध नोंदवला .

error: Content is protected !!