ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबईराजकीय

अस्वस्थ प्रजासत्ताक- बदलाव से दुनिया चांद पर पहुंची फिरभी परिवर्तन को नकारते है हम! धरम करम जात पात की घटिया सोच से कब आजाद होंगे बोलो हम!!

आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने समस्या सुधा वाढत आहेत.आणि याची अनेक कारणे आहेत त्यातले पाहिले कारण म्हणजे लोकांच्या मेहनतीचा पैसा देव, धर्म, पुतळे, स्मारके यासारख्या अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातोय आणि जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी कर्ज काढले जातेय आणि ही परिस्थिती असताना पंतप्रधान देशाला आर्थिक महासत्ता बनवायला निघालेत .वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०० दिवस आम्ही सुट्ट्या घेऊन काम धंदे बंद ठेवतोय त्यामुळे देशाचे उत्पादन आणि सरकारचा महसूल बुडतो आहे असे असताना देश कसा महासत्ता बनणार याचे उत्तर पंतप्रधान मोदींकडे नाही ..वास्तविक या देशात सर्व काही आहे विपुल खनिज संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन होतेय प्रचंड असे मनुष्यबळ आहे बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत पण या सर्वातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर होत नाही. एक लाख कोटी धर्म ,स्मारके,आणि इतर अनावश्यक गोष्टींसाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी पण यातून काय मिळणार आहे ? हाच पैसा जर उद्योग धंद्यासाठी वापरला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता या पैशातून शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असत्या तर त्याचा 18 मुलांना उच्च शिक्षित होण्यासाठी लाभ मिळाला असता याच पैशातून जर देशाच्या वेगवेगळ्या भागात अत्याधुनिक रुग्णालये उभी राहिली असती तर त्याचा जनतेच्या आरोग्याला फायदा झाला असता पुतले,स्मारके आणि बुलेट ट्रेन सारख्या अनवाह्या गोष्टींचा लोकांना काय फायदा ? सरकार मध्ये के कुणी बसले आहेत त्यांच्या जुनाट धार्मिक मानसिकतेत कधी परिवर्तन होणार आहे कुणास ठाऊक? जोवर आम्ही शाश्वत गोष्टींमध्ये विश्वास मानून त्यात परिवर्तनाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तोवर या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार नाही आणि तसे झाले तरच आपल्याला सारे जहसे अच्छा हिंदुस्तान हमारा असे म्हणण्याचा अधिकार असेल

error: Content is protected !!