ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मनसेच्या दनक्या मुळे कचरा वर्गीकरण करण्याची जागा भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई होणार


मुंबई/ महिला बचत गटाच्या नावाखाली पालिकेत आता नवे नवे झोल उघडकीस यायला लागले आहेत.काही दिवसांपूर्वी महिला बचत गटाच्या नावावर भलत्याच कंत्राटदाराकडून पार्किंग ची वसुली सुरू असल्याचे उघडकीस आले होते त्यानंतर आता दादर आशिष इंडस्ट्रीज येथील आकांक्षा महिला बचत गटाला दिलेल्या कचरा वर्गीकरण करण्याची जागा चक्क त्यांनी एका व्यापाऱ्याला भाड्याने दिल्याचे उघडकीस येताच मनसेने मोर्चा कडून याबाबत पालिकेला जाब विचारला .पालिकेने कचरा वर्गीकरण करण्यासाठी १० वर्षाच्या करारावर आकांक्षा महिला गटाला जागा दिली होती मात्र ती जागा त्यांनी एका व्यापाऱ्याला त्याचे समान ठेवण्यासाठी दिली ही एक प्रकारे पालिकेची फसवणूक असून त्यात पालिका अधिकाऱ्यांचा सुधा हात आहे त्यामुळे मनसेने महिमचे मनसे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतेत्वाखली मोर्चा कडून कारवाईची मागणी करताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी आकांशा महिला बचत गटाला ब्लॅक लिस्ट केले असून संबंधित अधिकारी व संस्थेवर एफ आय आर दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे

error: Content is protected !!