ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

कर्जतमधील नांदगाव व ओलमण येथिल शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!!!! आमदारांचा उपस्थितीत निवासस्थानी झाला प्रवेश!

रायगड(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नांदगाव व ओलमन येथिल शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवनेसेत जाहीर प्रवेश केला आहे. कर्जतचे आमदाह महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी हा प्रवेश समारंभ पार पडला आहे.
कर्जत तालुक्यांत कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा नेत्रुत्याखाली अनेक विकास कामे सुरु आहेत. त्यांचा या विकास कामांचा धडाक्याने कर्जत खालापुरात शिवसेना पक्ष प्रंचड वाढत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे आमदारांचा कार्याने प्रभावित होवुन आज कर्जत तालुक्यांतील नांदगाव ग्रामपंचायत व ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील अनेकांना शिवसेनेचे आमदार थोरवे यांचा निवासस्थानी जावुन सेनेत प्रवेश केला आहे. यामधे प्रामुख्याने पंचायत समितीचे माजी सदस्य सौ.चित्रा मनोहर खारोटे यांसह या परीसरातील अनेक कार्यकर्त्यांचा या प्रवेशात समावेश आहे.
आज शेकाप व राष्ट्रवादीतुन सेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे लहू पुनाजी कारोटे, प्रकाश मनोहर अगिवले, ज्ञानदेव वामन दिघे, शब्बीर इस्माईल भाबर्डे, काशिनाथ रामचंद्र झुगरे, जयेश रघुनाथ शिंगोळे, संजय भाऊ कराळे, अशा शंकर जोशी, काळुबाई नामदेव दिघे, साधना विठ्ठल मुंडे, विश्वास बाळू वाडेकर, विठ्ठल भवारी, रोहिणी पुंडलिक जोशी, सचिन लक्ष्मण कानडे, दीपक काळु शिंदे, दुर्गेश नामदेव फोपे, अरुण काळूराम कारोटे, अंकुश मारूती चिमटे अशा आहेत.
दरम्यान या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यांनतर या सर्व कार्यकर्त्यांमुळे नांदगाव व ओलमण ग्रामपंचायत मधे सेनेची ताकद अधिक वाढणार असल्याने येथे कार्यकर्त्यां मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचे सेनेत आमदार महेद्रशेठ थोरवे यांसह सेवेचे तालुका प्रमुख श्री उत्तम कोळंबे, उपतालुका प्रमुख भारत डोंगरे, उत्तम शेळके, विभाग प्रमुख रवी ऐनकर, नागेश साबळे, शत्रुघ्न शिंगोळे तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी सेनेत स्वागत केले आहे

error: Content is protected !!