ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

उल्हासनगरात अजुन एका इमारतीचा स्लॅब पडला .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरुच आहे . काल कॅंप ४ येथिल सुभाष टेकडी परिसरातील एका तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे . मात्र या इमारतीत कुटुंबे कमी राहत असल्याने कोणती ही जिवीत हानी झाली नाही . ही इमारत महापालिकेने खाली करुन ताबडतोब सील केली आहे .

उल्हासनगर शहरात दिवसे दिवस धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरुच राहणार आहे तर उल्हासनगर कॅंप ४ येथिल सुभाष टेकडी परिसरातील व्यंकट सदन ही तीन मजली इमारत आहे . या इमारतीचा काल अचानक स्लॅब कोसळला आहे ही माहीती महापालिकेचे अग्निशमन अधिकारी बाळु नेटके याना मिळताच त्यानी आपल्या जवानासह त्या इमारतीच्या ठिकाणी जावुन इमारती मध्ये राहणाऱ्या रहिवाश्याना त्वरित बाहेर काढले . तर महापालिका कर्मचारी व पोलिस कर्मचारी हे सुध्दा वेळेत पोहचले . परंतु या इमारती मध्ये कमी लोक राहत असल्याने कोणती ही जिवीत हानी झाली नाही . इमारतीचा स्लॅब कोसळण्याची ही गेल्या दोन महिन्यातील तिसरी घटना आहे. तर या पुर्वी सुध्दा इमारतीचे स्लॅब कोसळुन जिवीत हानी झालेली आहे . दरम्यान ही इमारत महापालिकेने ताबडतोब खाली करुन सील केली आहे . उल्हासनगर शहरात अजुन किती इमारतीचे स्लॅब कोसळत राहणार याचा काही अंदाज दिसुन येत नाही .

error: Content is protected !!