ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पवारांच्या बंगल्यावर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही – सदावर्तेचा माने भोवतीचा फास आवळला

मुंबई/शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करणे एस टी कामगारांना आता चांगलेच भारी पडले आहे कारण सरकारने एकीकडे त्या 109 जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे तर दुसरीकडे त्यांना एस टी च्य सेवेतून कायमचे बडतर्फ केले आहे पण त्यांच्या पेक्षा वाईट अवस्था झाली आहे त्यांना भडकावणारा सदावर्ते याची त्याच्यावर आता महाराष्ट्राच्या इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुधा गुन्हे दाखल झाल्याने त्याच्या माने भोवती कायद्याचा फास घट्ट आवळले गेला आहे काल न्यायालयाने त्याला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे
आज सदावर्ते याला गिरगाव न्यायालयात आणण्यात आले होते यावेळी न्यायमूर्ती पटेल यंच्या समोर सुनावणी झाली सदावर्ते याच्या बाजूने अँड.कुलकर्णी तर सरकार काढून प्रदीप घरात यांनी युक्तिवाद करताना सदावर्ते याच्या पापाचा पाढाच न्यायालयात वाचला .सदावर्ते यांनी संपकरी कामगारांकडून प्रत्येकी 530 रुपये याप्रमाणे 1लाख 80 हजार गोळा केल्याचे सांगितले तसेच पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट त्यानेच आखला होता आणि पुन्हा बारामती मध्ये 12 तारखेला सदावर्ते सत्कार करण्याची योजना होती तसेच हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते याला नागपूर मधून दोन कॉल आले होते असे सांगून त्याची 11 दिवसांची पोलीस कोठडी मागितली त्यावर सदावर्तेंचे वकील कुलकर्णी यांनी सांगितले की एस टी कामगारांनी स्वेच्छेने पैसे दिले तसेच पवारांच्या घरावर हल्ल्याचा कट नव्हत तर ते आंदोलनात असे कुलकर्णी यांनी सांगितले मात्र न्यायालयाने सदावर्ते याना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे
बॉक्स
पोलीस घेणार सदावर्ते ताबा
सदावर्ते याच्या विरोधात महाराष्ट्राच्या इतर पोलीस ठाण्यात सुधा गुन्हे दाखल आहेत आणि आज सातारा पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी आले होते पण त्याला पोलीस कोठडी झाल्याने सातारा पोलिसांना ताबा मिळाला नाही

error: Content is protected !!