ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्रमुंबई

मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकात -184 टू व्हीलर आणि 40 फोर व्हीलर


मुंबई/ महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली होती आता या पथकाला अधिकाधिक कार्यक्षम बनवण्यासाठी या पथकामध्ये 184 टू व्हीलर आणि 40 फोर व्हीलर गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे . गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरिमन पॉईंट येथे या गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच गृह सचिव आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निर्भय पथकाच्या या गाड्यांवर बी टी एस सिस्टीम लावलेली असल्याने या गाड्यांच नियंत्रण कंट्रोल रूम मधून केले जाणार आहे. या नवीन गाड्यांमुळे निर्भया पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमतेने काम करता येईल त्याचबरोबर एखादा गुन्हा घडल्यास तात्काळ त्या ठिकाणी पोचणे शक्य होईल त्यामुळे निर्भया पदरातील या गाड्यांचा पोलीस कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकेल.

error: Content is protected !!