ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

ड्रग प्रकरणातील सुनील पाटील अखेर मीडिया समोर प्रकटला

मुंबई/ नवाब मलिक आणि भाजपचा मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू असतानाच एन सी बी चां खबरी अशी ओळख निर्माण झालेला सुनील पाटील काल प्रसार माध्यमांच्या समोर प्रकटला आणि किरण गोसावी व भानुशाली हेचव्या प्रकरणाचे मास्टर माईंड असून भाजप नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने सांगितल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे तत्पूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज हाच या प्रकरणातला मास्टर माईंड असल्याचे सांगितले त्यावर पलटवार करताना मग मलिक इतके दिवस गप्प का राहिले . न्यायालयाच्या नोटिशिला त्यांनी उत्तर का नाही दिले असे म्हणत मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असून ते घाबरले असल्याचे मोहितेने सांगितले तर दुसरीकडे ज्या सुनील पाटीलचे सम डिसोजा याने नाव घेतले होते .त्याने आपल्याकडे क्रुझ वरच्यारेच पार्टी मध्ये भाग घेणाऱ्यांची लिस्ट आली होती . ती मला एम पी मधील एका भाजप नेत्याच्या नीरज यादव नावाच्या माणसाने दिली पण त्यात आर्यनचे नाव नव्हते शाहरुख खान कडून पैसे काढण्यासाठी किरण गोसावी भानुशाली आणि इतरांनी हा डाव रचला असावा .माझ्या जिवाला भाजप नेत्यांकडून धोका असल्याने मी घर सोडून गेलो होतो असे पाटील याने सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे

error: Content is protected !!