ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मिलिंद देवराचां काँग्रेसला रामराम

मुंबई/ दक्षिण मुंबईचे माजी खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला.त्याच्या सोबत काही आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला या सर्वांना नंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पक्षातून निलंबित केले.
देवरा कुटुंबीय गेली ५५ वर्ष काँग्रेसच्या सोबत आहेत.मिलिंदचे वडील मुरली देवरा यांनी काँग्रेसने भरभरून दिले काँग्रेसच्या जीवावर मुरली देवरा मुंबईचे महापौर तसेच केंद्रात मंत्री झाले.त्यांच्या पश्चात मिलिंद देवरा यालाही काँग्रेसने 2 वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री केला पण आता तो शिंदे गटात गेला आहे दक्षिण मुंबईत गुजराती मते अधिक आहेत त्यामुळे मिलिंद देवराला महायुती कडून लोकसभेचे तिकीट मिळेल आणि त्याच आशेवर तो शिंदे गटात गेला आहे पण देवरा कुटुंबियांवर गुजराती भाषिक समाज आणि मराठ्यांचा सुधा राग आहे.शिवाय दलित मुस्लिम तर भाजपच्या विरोधात आहे

error: Content is protected !!