ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

खिचडी घोटाळ्यात सुरज चव्हाणला अटक- ठाकरेंना मोठा झटका

मुंबई/ शंभर कोटी होऊन अधिक असलेल्या खिचडी घोटाळ्यात ठाकरेंचा निकटवर्ती सुरज चव्हाण याला आज अटक केली आहे यापूर्वी सुरत चव्हाण यांची या प्रकरणात चौकशी केलेली होती
कोरोना काळात मुंबईतून पलायन करणाऱ्या मजुरांसाठी मुंबई महानगरपालिकेने खिचडी पॅकेट वाटण्याची योजना राबवली होती तब्बल 132 कोटींच्या आसपास असलेल्या या योजनेत साठी काही कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती मात्र या कंत्राटदाराणे पालिकेला चुना लावला. या योजनेतील काही कंत्राटदार बोगस निघाले. यातील शिवसेनेची त्यावेळी महापालिकेत सत्ता होती त्यामुळे करोणाशी संबंधित वेगवेगळी कंत्राटी आपल्या लोकांना वाटण्याचे काम त्या वेळा केले होते मात्र त्यात अनेक ठिकाणी घोटाळे झाले खिचडी प्रकरणात हा घोटाळा झाला होता त्यामुळे किरीट सोमय्याने इडी कडे केलेल्या तक्रारीवरून शिवसेना नेते संजय राऊत त्यांचा भाऊ सुनील राऊत त्याचबरोबर संजय राऊत यांचा पुत्र कन्या व अमोल कीर्तिकर ईडीच्या रडारवर होते .त्याचबरोबर परळच्या केम हॉस्पिटल समोरील एक व्यावसायिक ईडीच्या रडावर होता कारण या घोटाळ्यातले बरेचसे पैसे या व्यवसायिकाच्या खात्यावर ट्रान्सफर झाले होते यात सुरज सर्वांचेही नाव आले होते. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी इंडिने सात ठिकाणी जे छापे टाकले होते या छाप्यात सुरज चव्हाणचाही समावेश होता .सुरज चव्हाणच्याही घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते त्यानंतर सुरेश चव्हाण ची ईडीने चौकशीही केली परंतु ईडीच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न दिल्याने तसेच त्याच्या चौकशीत काही महत्त्वाच्या पुराव्यांची कागदपत्र सापडल्याने अखेर त्याला आज इडीने अटक केली.

error: Content is protected !!