ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट -राष्ट्रपती राजवट लावण्याच्या हालचाली सुरू


मुंबई/ महाराष्ट्रात हनुमान चलीसावरून जे वातावरण बिघडले आहे.त्याचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी विरोधी पक्षाने आता कंबर कसली आहे.त्याचाच एक भाग म्हणून सोमय्यावर झालेल्या हल्ल्याचे निर्मित करून भाजपच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंग कोशारि यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार आणि पोलीस आयुक्तां विरुद्ध तक्रार केली आहे.
महाराष्ट्रात वातावरण बिघडलेले आहे ही वस्तुस्थिती पण हे वातावरण कोणामुळे बिघडले आणि ते कशासाठी बिघडवण्यात आले हे सर्वांना ठाऊक आहे .हनुमान चालीसा चां बालहट्ट धरणाऱ्या राणा दांपत्याला अटक झाल्यानंतर त्यांना भेटायला जाण्याची किरीट सोमय्या यांनी काहीच आवश्यकता नव्हती पण कसेही करून वातावरण बिघडवयचे असे ठरलेले असल्याने ते खार पोलीस ठाण्यात गेले यावेळी त्यांच्या गाडीवर चप्पल आणि दगड फेकण्यात आले त्याने गाडीची काच फुटली आणि सोमय्या जखम झाली पुढे या प्रकरणी त्यांनी खार पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला . पण तो पोलीस आयुक्तांच्या इशाऱ्यावरून बदलण्यात आला असा सोमय्या यांचा आरोप आहे आणि त्यासाठीच त्यांनी काल भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेतली आणि पोलीस आयुक्तांच्या चौकशीची मागणी केली तसेच महाराष्ट्रातील बिघडलेल्या परिस्थितीची राज्यपालांना माहिती दिली या सर्व घटना पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या हालचालींना वेग आलाय असेच दिसत आहे .

error: Content is protected !!