ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

परळ मधील बंद असलेल्या पालिकेच्या शाळेत सिलेंडरचे स्फोट


मुंबई – परळ परिसरातल्या मिंट कॉलनीतील बंद असलेल्या पालिकेच्या साईबाबा स्कूलमध्ये आज सहा ऑक्सिजन सिलेंडचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेवून आग आटोक्य़ात आणली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
दरम्यान शाळा बंद असल्याने मोठा धोका टळला. मात्र गेल्या दोन वर्षापासून हे सिलेंडर शाळेत पडून का होते? या प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधींकडून संताप व्यक्त केला जातो आहे.
महापालिकेच्या साईबाबा स्कूल या पाच मजली पालिका शाळेत आज सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास तळमजल्यावर कोविड कालावधीतील असलेले ऑक्सिजन सिलेंडरचे स्फोट होऊन गाद्या आणि इतर सामानाला आग लागली. पाच ते सहा सिलेंडरचे स्फोट एका मागोमाग झाल्याने बाजूच्या वसाहतींतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.आता या सिलेंडरच्या स्फोटाबाबत चौकशी सुरु झाली असून कोणाच्या निष्काळजीपणामुळे हे स्फोट झाले याबाबत चौकशी केली जात आहे ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा कोविडसाठी वापरण्यात आली होती. शाळा धोकादायक झाल्याने मागील दोन वर्षापासून बंद होती. या शाळेचा कोविडमध्ये वापर करण्यात आला होता. त्यानंतर ही शाळा धोकादायक असल्याने बंद होती. मात्र त्या काळात वापरले गेलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते, याच सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आतमध्ये असलेल्या गाद्यांनी पेट घेतला आणि आग वाढत गेल्याचे स्थानिक रहिवाशी, लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले.
अग्निशमन दलाला माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणल्याने मोठा धोका टळला. या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान सिंलेंडरचा स्फोट कशामुळे झाला याची अधिक चौकशी संबंधित यंत्रणांकडून केली जाते आहे.
पालिकेच्या साईबाबा मनपा शाळेत कोविड कालावधीतील असलेले ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आले होते. गाद्या आणि इतर सामानाला प्रचंड आग लागून सिलेंडरचे स्फोट झाले आणि मोठी आग लागली. सुदैवाने सदर शाळा धोकादायक स्थितीत असल्यामुळे ती बंद करण्यात आलेली होती. तीन-चार वर्षांपासून सदर शाळा गोडाऊन म्हणून वापरण्याचे काम मुंबई महानगरपालिकेचे सुरू होते.

error: Content is protected !!