ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

भाजप कडून उत्पल पर्रीकर यांचा पत्ता कट


पणजी/ गोव्यात ज्यांच्या मुळे भाजपा रुजली वाढली आणि सतेपर्यंत पोचली ते गोव्याचे विकासपुरुष माझी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदार संघातून भाजपने तिकीट नाकारले आहे.काल भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात उत्पल पर्रीकर यांचे नाव नसल्याने गोव्यातील जनता संतप्त झाली आहे
गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे .या निवडणुकीत सत्ताधारी भाजप विरुद्ध आप,तृणमूल,काँग्रेस,शिवसेना राष्ट्रवादी युती असा संघर्ष आहे.आप.काँग्रेस,तृणमूल यांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत तर शिवसेना राष्ट्रवादी युती आणि भाजपनेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली मात्र भाजपच्या ३४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे चिरजीव उत्पल पर्रीकर यांचे नाव नाही त्यांनी पणजी मतदार संघातून उमेदवारी मागितली होती पण त्यांना तिथून उमेदवारी नाकारून बाबुषा यांना उमेदवारी देण्यात आली हा दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा अपमान आहे कारण भाजपला पर्रीकर यांच्यामुळेच गोव्यातील सता मिळाली होती पण त्याचा भाजपला विसर पडला आणि पर्रीकर यांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आली दरम्यान काळ पत्रकार परिषदेत बोलताना गोव्याचे निवडणूक prbhari देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की उत्पल पर्रीकर यांच्या समोर आम्ही दोन ऑप्शन ठेवले आहेत कारण पर्रीकर कुटुंबांच्या विषयी आम्हाला आदर आहे.फडणवीस यांची ही ऑफर उत्पल पर्रीकर यांना मान्य नसल्याचे समजते तर दुसरीकडे उत्पलने जर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर आम्ही सर्व त्यांना पाठींबा द्यायला तयार आहोत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे त्यामुळे भाजपच्या विरोधात उत्पल पर्रीकर यांनी जर पणजी मधून निवडणूक लढवली तर भाजपच्या बाबुशो यांचा पराभव अटळ आहे शिवाय गोव्यात पर्रीकर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तो भाजपच्या विरोधात जाऊ शकतो आणि निवडणुकीत भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो
लीड

error: Content is protected !!