ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

रस्त्यावरच्या चिकन शोरमाने घेतला 19 वर्षाच्या मुलाचा बळी


मुंबई/रस्त्यावरच्या फुटपाथवर अन्नपदार्थ शिजवून ते विकणे गुन्हा आहे असे असतानाही आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्या जातात आणि या गाड्यांवर वडापाव पासून ते चिकन शोरर्मा पर्यंत वेगवेगळे खाद्यपदार्थ असतो त्याच ठिकाणी शिजवून विकले जातात मात्र अशाच एका खाद्यपदार्थाने ट्रॉम्बे मध्ये एका 19 वर्षाच्या मुलाचा बळी घेतला आहे . पालिका अधिकारी हप्ते घेऊन अशा फेरीवाल्यांना धंदा लावण्यास परवानगी देतात त्यामुळे पालिका अधिकाऱ्यावर सुधा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
मागील आठवड्यात ट्रॉम्बे येथे फुटपाथवर गाडी लावणाऱ्या फेरी वल्याच्या गाडीवरून प्रथमेश भोसले या 19 वर्षाच्या मुलाने चिकन शोरमा घेतला होता पण तो खाल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली त्याला वांत्या होऊ लागल्या सुरुवातीला त्याला स्थानिक रुग्णालयात दखल करण्यात आले व त्यानंतर त्याला केईएम मध्ये हलवण्यात आले पण तिथे त्याचा सोमवारी मृत्यू झालं या प्रकरणी शोरर्मा विक्रेते आनंद कांबळे व मोहममद अहमद शेख यांच्या विरुद्ध कलम 307 व 34 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.मात्र मुंबईत बेकायदेशीर फुटपाथवर अन्नपदार्थ विकले जात असल्यानेच अशा घडतात त्यामुळे ज्या विभागात अशा घटना घडतील त्या विभागातील पालिका अधिकाऱ्याला सुधा सह आरोपी करून त्याच्यावर गुन्हा दखल करावा अशी मागणी केली जात आहे

error: Content is protected !!