ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

गुजराती सोसायटीत पुन्हा मराठी माणसांना बिल्डरने घर नाकारले


मुंबई/ या देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणी काय खायचे कोणी कसले कपडे घालायचे घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे असताना मुंबईतील काही गुजराती मारवाडी लोकांनी मराठी माणसांना घर नाकारण्यासाठी बिल्डरांकडे गळ घातली आहे त्यामुळे मुंबईतील बहुतेक बिल्डर मराठी माणसांना घर नाकारत आहेत हा सगळा प्रकार संताप जनक असून अशा बिल्डरांना ओसी देऊ नये अशी मागणी मुंबईतील मराठी माणसाने केली आहे
विलेपार्ले येथे आर्केड बिल्डरने एका मराठी माणसाला घर नाकारले होते घरासाठी बिल्डरांकडे जाणाऱ्या मराठी माणसांना तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी आहेत असे प्रश्न विचारले जातात आणि मांसाहारी असेल तर घराच्या किमती आवाच्या सव्वा वाढवल्या जातात किंवा त्यांना घर नाकारले जाते हा सगळा प्रकार उद्धव ठाकरे गटाच्या समन्वयक जुईली शेंडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आर्किटेक बिल्डरला गाठले व त्याला या गोष्टीचा जाब विचारला त्यानंतर मात्र त्यांनी असा यापुढे फिरवाव होणार नाही असे आश्वासन दिले आहे मात्र या घटनेने मुंबईतील मराठी माणसांमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्याचबरोबर आता कुठे गेले ते मराठी माणसांचे तारणहार असा संवाद ही विचारला जात आहे अशा प्रकारच्या घटना यापूर्वी फक्त मीरा-भाईंदर परिसरात घडत होत्या मधल्या काळात घाटकोपर आणि मुलुंड या भागातील अशा घटना उघडकीस आल्या होत्या परंतु आता मात्र विलेपार्ल्यासारख्या मूळ मराठी माणसाच्या सुसंस्कृत शहरात अशा घटना घडू लागल्याने मराठी माणसांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे

error: Content is protected !!