ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यावर तुरुंगात विषप्रयोग

इस्लामाबाद -गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत. सोमवारी असाच एक हत्येचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील अतिरेकी साजिद मीर याची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मीर याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे.
साजिद मीर हा २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एक होता. तो लाहोरच्या मध्यवर्थी कारागृहात असून त्याला जेवणातून विष देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. साजिद मीरवर विषप्रयोग झाल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने त्याला तुरुंगातून थेट रुग्णालयापर्यंत एअरलिफ्ट केलं. त्याच्यावर सध्या बहावलपूरमधील रुग्णालयात उपचार चालू आहेत.

error: Content is protected !!