ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त दादर – आदिलाबाद २ विशेष गाड्या

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे दादर ते आदिलाबाद दरम्यान २ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभुमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहेत.
मध्य रेल्वेने दिल्या माहितीनुसार,ट्रेन क्रमांक ०७०५८ विशेष गाडी ०५ डिसेंबर २०२३ रोजी आदिलाबाद येथून सकाळी ०७.०० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी मध्य रात्री ३.३० वाजता पोहोचल
विशेष ट्रेन क्रमांक ०७०५७ गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी दादर येथून रात्री १.०५ वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता पोहोचेल. या दोन्ही विशेष गाड्या आदिलाबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, हुजूर साहेब नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगांव, नागरसोल, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण आणि दादर स्थानकांवर थांबणार आहेत.

error: Content is protected !!