ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

७ डिसेंबरला मुंबईत पाणी कपात


मुंबई महानगरपालिकेच्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने तज्ज्ञ समितीकडून पाहणी करण्यात येणार आहे. या कारणांनी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडीत असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी ७ डिसेंबर रोजी होणारा पाणीपुरवठा खंडीत लक्षात घेता मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी कामासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीमार्फत गुरूवार, दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक दोन ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक 2 रिक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे काही भागांत पाणीपुरवठ्यामध्ये पाणीकपात करावी लागणार आहे.
गुरूवार, दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या दोन तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यासाठी कप्पा रिक्त केल्याने, मुंबई शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
अशी होणार पाणी कपात

‘ए’ विभाग-
कफ परेड आणि आंबेडकर नगर – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११. २० ते दुपारी १. ४५ वाजेपर्यंत)- या ठिकाणी १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहिल.
नरिमन पॉईट आणि जी. डी. सोमाणी – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १. ४५ ते 3 वाजेपर्यंत) – पाणीपुरवठ्यात ५० टक्के पाणीपुरवठ्यात करण्यात येईल.
मिलिट्री झोन- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – २४ तास) – पाणीपुरवठ्यात 30 टक्के कपात करण्यात येईल.
मलबार हिल आणि आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) – पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येईल.
सी विभाग-
मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘सी’ विभागातील सर्व क्षेत्र – पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येईल.
डी विभाग-
पेडर रोड- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी १ ते रात्री १०. ३० वाजेपर्यंत) – पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येईल.
मलबार हिल आणि आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येईल.)
जी उत्तर व जी दक्षिण विभाग-
जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग – पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येईल

error: Content is protected !!