ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

याला निवडणूक म्हणायची का ?

निवडणुका आणि लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे लोकशाहीचे आणि मेंदू आहेत तर संविधान हा आत्मा आहे.मात्र या तिन्ही यंत्रणा पोखरल्या जात आहेत आणि त्यामुळेच लोकशाही दिवसेंदिवस कमजोर बनत चालली आहे.निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून केवळ पैसा आणि ताकत या दोन गोष्टीचा जोरावर निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच तिकीट दिले जाते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था पासून संसदेपर्यंत अनेक गंभीर गुन्ह्यातील लोक आमदार खासदार आणि नगरसेवक बनलेत.सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि यूपीत नुकतेच पहिल्या टप्प्यातील ११ जिल्ह्यांमधील ५८ जगांसाठीचे मतदान पार पडले पहिल्या टप्प्यात ६१.१७ टक्के इतके मतदान झाले याच अर्थ लोकांचा आजही निवडणुकांवर थोडाफार विश्वास आहे.पण तो भविष्यात टिकेल की नाही हे मात्र सांगता येत नाही कारण युपी विधानसभेतील ज्या ४०३ तीन जागांसाठी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी ३० टक्क्यांहून अधिक गुन्हेगारांना तिकीट दिलेले आहे त्यामुळे २०२२ नंतर युपी विधानसभेतील चित्र काय असेल हे सांगायची गरज नाही.पहिल्या टप्प्यातील मतदान काही चुटपुट घटना वगळता शांततेत पार पडले पण उर्वरित सहा टप्प्यांतील मतदान खरोखरच शांततेत पार पडेल याची शाश्वती नाही कारण देशाला दुसऱ्या फलनिकडे नेऊ पाहत असलेला हिजाब सारखा ज्वलंत मुद्दा दिवसेंदिवस सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरतोय.अशा परिस्थितीत युपी मध्ये जाती धर्माच्या नावावर निवडणूक पेचार सुरू आहे आणि त्यात हिजाब चां मुद्दा हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजाकडून कॅश केला जातोय त्याचा आज ना उद्या मोठा भडका उडण्याची शक्यता आहे
कोणतीही निवडणूक विकासाच्या आणि राष्ट्रीय मुद्द्यावर लढवली जायला हवी पण. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीस जातीय स्वरूप आले आहे कारण प्रत्येक पक्षाने त्यात्या मतदार संघातील जातीची आकडेवारी बघून त्यात्या जातीचा उमेदवार दिला आहे मग तो चोर असो डाकू असो बलात्कारी असो की खुनी असो ज्या मतदार संघात त्याची दादागिरी चालते लोक त्याच्या दहशतीखाली वावरतात अश ३० टक्क्यांहून अधिक लोकांना काँग्रेस,भाजपा,समाजवादी पार्टी,बसपा या प्रमुख पक्षांनी तिकिटे दिलीत आणि हे गुन्हेगार यापुढे युपी सारख्या देशातील सगळ्यात मोठ्या रज्याचे भवितव्य ठरवणार आहेत त्यासाठी परचारा मध्ये सुधा जात धर्म आणला जातोय आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जातीयवादी परचारत पंत प्रधान मोदींसह अनेक बडे नेते हिरहिरीने भाग घेत आहेत.हा सगळा प्रकार भयानक आणि तितकाच भीतीदायक आहे जर उद्या या जातीयवादी परचारावरून वातावरण बिघडले आणि दंगली उसळल्या तर त्यात सामान्य माणसाचा बळी जाईल आग लावणारे बाजूला होतील त्यामुळे हे थांबायला हवे पण कोण थांबवणार? कारण ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे तेच निवडणुकीत जातीयवादी परचारात भाग घेत आहेत मग अशा वातावरणात होणाऱ्या निवडणुकांना निवडणुका म्हणायचे का असा सवाल देश वासी सर्वच पक्षांना विचारीत आहेत

error: Content is protected !!