ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कॉंग्रेस सोडून भाजपात गेलेल्याअशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी ?

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हाताची साथ सोडत हाती कमळ घेतले. अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामध्ये खरी भूमिका बजावली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांच्या या खेळीने अकेला देवेंद्र क्या करेगा असे म्हणणाऱ्या विरोधकांना चांगलाच हादरा बसला आहे.
आगे आगे देखो होता है क्या असं अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांचे हे सूचक वक्तव्य होते. देवेंद्र फडणवीस कधीच अशी मोगम वक्तव्य करत नाहीत, असे म्हटले जाते. मात्र, फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात काही तरी भूकंप होणार हे मात्र नक्की होतं. आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना, नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडणारे फडणवीस पुन्हा एक राजकीय भूकंप करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. अखेर फडणवीस यांनी तो राजकीय भूकंप घडवून आणला. गेली ३८ वर्ष काँग्रेससोबत असलेल्या आणि दोनवेळा माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांना अखेर भाजपमध्ये घेत फडणवीसांनी काँग्रेसला हादरा दिला. एवढंच नाही तर अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतर आणखी काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे पुन्हा सूचक वक्तव्य त्यांनी केले.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश ही रणनिती मागील वर्षभरापासून आखलेली फडणवीस यांची खेळी होती. वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मित्राच्या घरी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीतच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. फ़क्त योग्य वेळ येण्याची देवेंद्र फडणवीस वाट बघत होते.
केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे.पी नड्डा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेतलं तर काय फायदा होईल हे पटवून दिले
अशोक चव्हाण आल्याने लोकसभा नाही तर विधानसभेत देखील भाजपला फायदा होईल हे केंद्रीय नेतृत्वाला फडणवीस यांनी पटवून दिले
केंद्रीय नेतृत्वाचा हिरवा झेंडा आल्यानंतर फडणवीस अशोक चव्हाण यांना दिल्लीत अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांच्या भेटीसाठी दिल्लीत घेऊन गेलेत
ही भेट गुप्त ठेवत काँग्रेसला गाफील ठेवण्यात फडणवीस यांना यश मिळाले
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांना फोडत मविआ खिळखिळी करण्याची फडणवीसानी रणनीती आणखी आणि ती यशस्वी देखील केली. अशोक चव्हाण हे मागील दोन वर्षांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. हेच फडणवीसांनी हेरलं खेळी आखली. पण नेमके अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये नेमकं का घेतलंय त्यांचा नेमका फायदा काय होणार? याची चर्चा रंगली आहे.
भाजपला मराठवाड्यात मोठ्या मराठा चेहऱ्याची गरज होती अशोक चव्हाण यांच्या रूपाने भाजपला हा चेहरा मिळाला
मराठवाड्यातील प्रभावी नेतृत्व
प्रशासनावर पकड आणि शांत संयमी अशी अशोक चव्हाण यांची ओळख
दोन वेळा मुख्यमंत्री पदाचा अनुभव असलेला नेता
अशोक चव्हाण यांच्या रूपात फडणवीसाच्या हाती मविआची संपूर्ण व्ह्यूहरचना लागली आहे.

error: Content is protected !!