ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्र

उल्हासनगर महापालिका शिक्षण समितीच्या सभापतीना धमकीचे पत्र .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार चव्ह्याट्यावर आणणारे मनविसे चे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्या वर प्राण घातक हल्ला झाला होता त्याच पध्दतीने तुम्ही काम केले तर तुम्हाला ही मनोज शेलार प्रमाणेच धडा शिकवु असे धमकीचे पत्र शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बेहनवाल याना त्यांच्या कार्यालयात मिळाले आहे. या पत्रामुळे महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे . तर सदर पत्र हे कोण ठेवुन गेले याचा सी सी फुटेज द्वारे तपास सुरु आहे . हा प्रकार गंभीर असुन जो कोणी हे धमकीचे पत्र कार्यालयात ठेवुन गेले असेल त्यानी समोरा समोर येवुन दाखवाव मग आम्ही त्याला शिवसेनेचा दणका दाखवतो अशी प्रतिक्रिया शहर प्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी यानी दिली आहे .

उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने या प्रकरणी मनविसेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार यानी आवाज उठवला होता . परंतु त्याना गप्प करण्यासाठी त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता . दरम्यान सध्या शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बेहनवाल ह्या असुन त्यानी शिक्षण विभागाच्या कामात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सुरु केला असुन भ्रष्ट अधिकाऱ्यांचे या मुळे धाबे दणाणले आहे . तेव्हा या सभापतीनी शिक्षण विभागात जास्त ढवळाढवळ करु नये आणि शिक्षण विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण राहावे या करिता कोणी तरी शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बेहनवाल यांच्या कार्यालयातील टेबलावर धमकीचे पत्र ठेवुन दिले आहे . त्या पत्रात म्हटले आहे की तुमचा ही मनोज शेलार करु असा मजकुर लिहला आहे . या पत्रा मुळे महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे . दरम्यान पत्र लिहणाऱ्यानी समोर येवुन बोलाव त्याला शिवसेनेच्या वतीने दणका दिल्या शिवाय राहु नाही अशा प्रतिक्रिया शहर प्रमुख राजेंद्र चौधरी व धनंजय बोडारे यानी दिल्या आहेत . तर या पत्राची चौकशी पोलिसा मार्फत करण्यात येणार आहे

error: Content is protected !!