ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

स्वागत नवं वर्षाचे आव्हान परतलेल्या कोरोनाचे

सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना तोंड देत रोजच्या गरजा भागवताना पैशाची भासणारी चणचण ! या सर्वातून वाटचाल करताना माणसाची चांगलीच दमछाक होते आहे .आणि असे असतानाही माणूस जगण्यासाठी रोजच्या रोज परिस्थितीशी संघर्ष करीत आहे .आणि हे सर्व प्रत्येक वर्षी तो अनुभवत असल्याने आता ही सगळी संकटे त्याच्या रोजच्या जिवणाचाच एक भाग बनली आहेत. या संकटाचा माणूस कसाही सामना करू शकतो पण समोर आणखी एक भयानक संकट उभे आहे आणि ते म्हणजे कोरोणाचे संकट! कोरोणाची तीव्रता किती भयंकर असते ते माणसाने 2020 पासून तब्बल दीड वर्ष अनुभवली भारतात जवळपास दीड कोटी लोकांना करोन झाला होता त्यातील साडेचार लाख लोकांचा मृत्यू झाला .ज्यांचा कोरोनातून मृत्यू झाला ते सुटले पण त्यांच्या कुटुंबाचे जे हाल, झाले त्याच्या आठवणीने सुधा अंगावर काटा येतो, कोरोनाच्या वेळी झालेल्या लोकडाऊन मुळे उद्योग धंदे बंद पडले कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली . पैसा अभावी मुलाबाळांचे शिक्षण बुडाले.जे लोक भाड्याने राहत होते त्यांना घरभाडे थकल्याने बेघर व्हावे लागले त्यातच कोरोना काळात उपचाराच्या नावाखाली काही ठिकाणी डॉक्टर लोकांना लुबडत होते त्यामुळे जगणे मुश्किल झाले होत 2021 चां शेवटच्या टप्प्यात लसीकरण सुरू झालं आणि हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसे सरकारने कोरोना काळात लावलेले निर्बंध उठवले आणि 2022 पासून जनजीवन पूर्वपदावर आले. करोनातून जे वाचले त्यांच्यासाठी उर्वरित आयुष्य हा एक प्रकारे बोनस च म्हणावा लागेल आणि म्हणूनच वर्षभराने पुन्हा करोना परतल्याने जगातील प्रत्येक माणूस भयभीत आहे.पुन्हा 2020 सारखी परिस्थिती येऊ नये यासाठी माणूस ईश्वराकडे प्रार्थना करतोय

error: Content is protected !!