ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहापालिकामुंबई

कुर्ल्यात शिव मंदिराच्या पुजाऱ्यावर भूमाफियाच्या गुंडांचा भ्याड हल्ला


मुंबई- कूर्ला- आजकाल भूमाफिया इतके उन्मत्त झाले आहेत की त्यांना कायदा व पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही. त्यामुळे जमिनी हडप करणे,त्यासाठी खून खराब करणे हे आता नित्यचे झाले आहे. कूर्ल्यात फिरोज पठाण नावाच्या भूमाफियाच्या गुंडांनी गौरी शंकर मंदिराच्या पुजाऱ्यावर र्भ्याड हल्ला केला असून या हल्ल्यात पुजारी जखमी झाले आहेत .याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला असून या हल्ल्याचा संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. दिनाक 5/8/2021 रोजीची घटना आहे॰
कैलास दामोदर (६१) हे कुर्ला येथील गौरी शंकर मंदिराचे पुजारी असून ते जवळच पत्नी व दोन मुलींसह राहतात .दरम्यान मंदिराच्या जवळच त्या भागातील भूमाफिया फिरोज पठाण याने अनधिकृत बांधकाम केले आहे .त्या विरुद्ध भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल बडगुजर आणि पुजारी कैलाश दामोदर यांनी पालिकेच्या एल विभाग कार्यालयात लेखी तक्रार केली होती .मात्र या अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून व्यवस्थित कारवाई होत नसल्याने गुरुवारी कैलास हे पालिका कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. मात्र तेथून परत येत असताना पालिका कार्यालय पासून काही अंतरावरच फिरोज पठाण यांच्या गुंडांनी पुजारी कैलास यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यात जखमी झालेल्या पुजारी कैलास यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .फिरोजच्या गुंडांनी पुजारी कैलाश यांच्याकडचे ८ हजार रुपये आणि कागदपत्रे सुधा पळवले .या घटनेमुळे कुर्ल्यातील तणावाचे वातावरण आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

error: Content is protected !!