ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

उल्हासनगर महापालिकेत बनावट सहीचे नियुक्तीपत्र देणारे अटक .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेत नोकरी लावुन देतो असे सांगुन वायरमन पदाचे व अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले नियुक्तीपत्र दिल्याचे उघड झाले असुन या प्रकरणी कैलास शेकडे सह मध्यवर्ती पोलिसानी दोन जणाना अटक केली आहे .

उल्हासनगर महापालिकेत वारसा हक्काने अथवा नोकरी विकत घेवुन लागणारे बरेच आहेत . त्यातच गेल्या एक महिन्यापुर्वी वायरमन ची नोकरी महापालिकेच्या विद्युत विभागात लागुन देतो असे एका सांगुन कैलास शेकडे यानी उपायुक्त अशोक नाईकवडे व आणखीन एका अधिकाऱ्याच्या सहीचे नियुक्ती पत्र तयार करुन दिल्याचे उघड झाल्याने महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे . दरम्यान या प्रकरणी उपायुक्त अशोक नाईकवडे यानी कैलास शेकडे विरुध्द मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर त्याला मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यानी अटक केली आहे . दरम्यान या महापालिकेत २००२ मध्ये भरती झाली होती. तेव्हा पासुन भरती न करता वारसा हक्क आणि अनुकंपा तत्वावरच कामाला घेत आहेत . मात्र हे बनावट नियुक्ती पत्र देवुन तरुणांची फसवणुक करणारे रॅकेट महापालिकेत सुरु झाले आहे . या बाबत नागरिकानी सावधानता बाळगणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे उल्हासनगर महापालिकेत कोण हे रॅकेट चालवते याचा शोध अधिकारी घेत आहेत

error: Content is protected !!